साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:34 PM2020-04-25T17:34:05+5:302020-04-25T17:34:27+5:30
कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर नविन कामास आरंभ तर नाहीच शिवाय अक्षय तृतीया पुजेसाठी लागणारे साहित्य विक्रेते सुध्दा ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस . अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजून एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात परंतु यावर्षी कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर नविन कामास आरंभ तर नाहीच शिवाय अक्षय तृतीया पुजेसाठी लागणारे साहित्य विक्रेते सुध्दा ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
२६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण आहे. या सणाकरिता मडके, पत्रावळी आदि साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षी बाजारात गर्दी दिसून येत यावर्षी मात्र विक्रेत ग्राहकांच्या प्रतिक्षेत दिसून आले. जिल्हयात कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केली आहे. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्याने अक्षय तृतीयेनिमित्त लागणारे साहित्य माठ, रांजण, मटकी, झाडू, पत्रावळी दुकानांवर शुकशुकाट दिसून आला.
तसेच अक्षय तृतीयेला दान केल्यास विविध संकटातून मुक्तता होते असंही मानल्या जाते. अनेक लोक या दिवशी नविन कामाची सुरुवात किंवा एखादया कामाची सुरुवात करतात. तसेच अन्नदान करतात परंतु संचारबंदीमुळे कोणतेच कार्य करता आले नाही.
बॉक्स - सोने, गाडी, कपडा खरेदीवर परिणाम
४कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेशिवाय कोणतेही दुकाने उघडी नाहीत. अत्यावश्यक सेवेमध्ये सोने, गाडी व कपडा खरेदी येत नसल्याने दरवर्षी कोटयवधी रुपयांची होत असलेली उलाढाल यावर्षी थांबलेली दिसून आली.वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाºया अक्षय तृतीयेला सोने, गाडी किंवा कपडयांची खरेदी शुभ संकेत मानले जातात.परंतु यावर्षी या वस्तु खरेदीला ब्रेक दिसून आला.
नविन कार्य करण्यासही लागला ब्रेक
४अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. हा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कायार्चे शुभ फल मिळते. परंतु कोरोनाच्या पृष्ठभूमिवर संचारबंदी लागू असल्याने जिल्हयात कोणत्याच नविन शुभकार्यास प्रारंभ झालेला दिसून आला नाही.