वाशिम पोलीस मुख्यालयात ‘सायबर जाणीवजागृती कार्यक्रम’ : विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:15 PM2018-01-23T16:15:38+5:302018-01-23T16:16:39+5:30

वाशिम : संगणकाने सद्या सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे; परंतु चुकीच्या पद्धतीने आपणच आपली वैयक्तिक माहिती जाहीर करित असल्याने फसवणूकीची अनेक प्रकरणे उघड होत आहेत.

'Cyber ​​Jnanavajagruti Program' at Washim Police Headquarters | वाशिम पोलीस मुख्यालयात ‘सायबर जाणीवजागृती कार्यक्रम’ : विविध विषयांवर मार्गदर्शन

वाशिम पोलीस मुख्यालयात ‘सायबर जाणीवजागृती कार्यक्रम’ : विविध विषयांवर मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देसंगणकीय तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याचा वापर जपूनच करायला हवा, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी केले. सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांनी विविध विषयांची उदाहरणे देऊन उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले.


वाशिम : संगणकाने सद्या सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे; परंतु चुकीच्या पद्धतीने आपणच आपली वैयक्तिक माहिती जाहीर करित असल्याने फसवणूकीची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. दरम्यान, संगणकीय तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याचा वापर जपूनच करायला हवा, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी केले.
जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २३ जानेवारी रोजी नवीन पोलीस मुख्यालयात ‘सायबर जाणीवजागृती कार्यक्रम’ पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. इंटरनेटच्या माध्यमातून बँकींग व आॅनलाईन व्यवहार, फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या समाज माध्यमांवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणती काळजी घेणे गरेचे आहे. तसेच समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीचा व आमीषाला बळी पडून आपले नुकसान करू नये. आॅनलाईन बँकींग व्यवहार करित असताना आपली वैयक्तिक माहिती, ई-मेल, खाते क्रमांक, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासवर्ड, पीन आदी गोपनिय माहिती कुणालाही शेअर करू नका. क्रेडिट, डेबीट कार्ड स्वत: स्वाईप करा, कुणाकडेही देवू नका. सायबर गुन्हेगार या माहितीच्या आधारे फसवणूक करून आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. त्यामुळे एकूणच या सर्व बाबींचा वापर करताना चोखंदळ राहायला हवे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांनी विविध विषयांची उदाहरणे देऊन उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले. कार्यक्रमास पोलिस उपअधिक्षक (गृह) किरण धात्रक, पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे, पोलिस नायक प्रदिप डाखोरे, अमोल काळमुंदळे, प्रशांत चौधरी, सहायक जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप आदिंची उपस्थिती होती.

Web Title: 'Cyber ​​Jnanavajagruti Program' at Washim Police Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.