सायकलस्वारांची "शांती संदेश यात्रा" पोहचली जम्मुत!
By admin | Published: May 29, 2017 07:35 PM2017-05-29T19:35:02+5:302017-05-29T19:51:12+5:30
वाशिम : शहरातील युवा समाजसेवी युवकांनी एकत्रित येवून सायकलस्वार ग्रुपच्या माध्यमातून शांती संदेश यात्रा "वाशिम टु जम्मु काश्मिर" १४ मे रोजी काढली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील युवा समाजसेवी युवकांनी एकत्रित येवून सायकलस्वार ग्रुपच्या माध्यमातून शांती संदेश यात्रा "वाशिम टु जम्मु काश्मिर" १४ मे रोजी काढली. सदर सायकलस्वारांची यात्रा २९ मे रोजी जम्मु मध्ये पोहचली. सायकल यात्रा जम्मुमध्ये पोहचल्याबरोबर सायकलस्वारांच्यावतिने एकमेकांना आलिंगन घालून शुभेच्छा देण्यात आल्यात.या वारीमध्ये श्रीनिवास व्यास, मनिष मंत्री, आदेश कहाते, कृष्णकांत इंगोले, हरक पटेल, यश शिंदे, गजानन इंगोले, रेखा रावले, सागर रावले, सुधाकर संगवर, दीपक एकाडे, आशिष शर्मा, श्रीरंग गुजरे, नीरज चोरले, सुरज शर्मा या १५ सायकलपटूंनी सहभाग आहे. प्रवासादरम्यान सायकलस्वारांनी ना. नितिन गडकरी यांची सुध्दा भेट घेतली होती. तसेच विविध ठिकाणी त्यांनी विविध सामाजीक विषयावर जनजागृती केली. सायकल चालविल्याने पेट्रोल व डिझेलची बचत होवून प्रदुषणापासून मुक्ती मिळून पर्यावरणाची होणारी हानी थांबत असल्याचे सायकलस्वारांच म्हणणे आहे.