सिलिंडरचा स्फोट, १६ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू!

By admin | Published: May 10, 2017 07:10 AM2017-05-10T07:10:13+5:302017-05-10T07:10:13+5:30

मानवतकर कुटूंबियांवर काळाचा घाला : घरात लग्नाच्या साखरपुड्याची धामधूम सुरू असताना घडली ह्रदयद्रावक घटना

Cylinder bomb blast, 16-year-old daughter dies | सिलिंडरचा स्फोट, १६ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू!

सिलिंडरचा स्फोट, १६ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू!

Next

वाशिम :  घरामध्ये लग्नापूर्वीच्या साखरपुड्याची जय्यत तयारी झालेली असताना कार्यक्रमाच्या पहाटेच स्वयंपाक घरातील सिलींडरचा स्फोट झाला. या भीषण घटनेत एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला; तर घरातील अन्य दोनजण जखमी झाले. ही घटना वाशिम ते रिसोड मार्गावर असलेल्या दत्त नगर येथे मंगळवार, ९ मे रोजी सकाळी ७:३० वाजता घडली.
मध्यप्रदेश येथे वास्तव्यास असलेले मानवतकर यांच्या कुटूंबामध्ये राधा अशोक मानवतकर या मुलीचा विवाह लोणार तालुक्यातील दाभा येथील तरूणाशी जुळला. त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम ९ मे रोजी वाशिम येथे मानवतकर यांचे मुळ गाव असलेल्या जांभरूण नावजी परिसरात होता. या कार्यक्रमानिमित्त वधु-वर यांचेसाठी लागणारे दागिने, कपडे, येणाऱ्या वऱ्हाडासाठी जेवनाची व्यवस्था असे सर्व साहित्य घरामध्ये चार-पाच दिवसांपूर्वीच आणून ठेवले होते. राधा मानवतकर हिच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १५ ते २० पाहुणे आलेले होते. त्यात ईटारसी येथील राधा हिची चुलत बहिन माला रमेश मानवतकर (वय १६) हिचा समावेश होता. मंगळवारला सकाळी सर्व पाहुणे मंडळीसाठी चहा ठेवण्याच्या निमित्ताने गॅस पेटवत असताना अचानक गॅसने भडका घेतला.
या भडक्याने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. हा स्फोट एवढा भीषण होता की सिलींडरच्या टाकीचे तुकडे सुमारे २०० ते ३०० मिटरपर्यंत दुर फेकल्या गेले. एवढेच नव्हे तर टिनाचे घर असल्यामुळे संपुर्ण टिनाचा अक्षरश: चुराडा झाला.
सिलेंडरचा भडका उडाल्यानंतर घरातील सर्व मंडळी घराबाहेर पडली. परंतू, घरामध्ये पलंगावर माला रमेश मानवतकर ही गाढ झोपेत असल्याचे कुणाच्याही ध्यानीमनी आले नाही. माला हिला आगीचे चटके जानवल्यानंतर तिने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली, परंतू आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे तिला कुणीच वाचवू शकले नाही. या आगीमध्ये माला हिच्या शरिराचा अक्षरश: कोळसा झाला. घरातील नवरी-नवरदेवाचे कपडे, दागिने, स्वयंपाकासाठी आणलेले धान्य असे अंदाजे ३ ते ४ लाख रूपयाचे साहित्यही या आगीमध्ये भस्मसात झाल्याची माहिती आहे.

Web Title: Cylinder bomb blast, 16-year-old daughter dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.