सायकलस्वारांची ‘शांती संदेश यात्रा’ पोहचली जम्मूत!
By admin | Published: May 30, 2017 01:34 AM2017-05-30T01:34:37+5:302017-05-30T01:34:37+5:30
सायकलस्वारांमध्ये आनंद : १५ सायकलपटूंचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील युवा समाजसेवी युवकांनी एकत्रित येऊन सायकलस्वार ग्रुपच्या माध्यमातून शांती संदेश यात्रा ‘वाशिम टू जम्मू काश्मीर’ १४ मे रोजी काढली. सदर सायकलस्वारांची यात्रा २९ मे रोजी जम्मूमध्ये पोहचली. सायकल यात्रा जम्मूमध्ये पोहचल्याबरोबर सायकलस्वारांच्यावतीने एकमेकांना आलिंगन घालून शुभेच्छा देण्यात आल्यात. या वारीमध्ये श्रीनिवास व्यास, मनीष मंत्री, आदेश कहाते, कृष्णकांत इंगोले, हरक पटेल, यश शिंदे, गजानन इंगोले, रेखा रावले, सागर रावले, सुधाकर संगवर, दीपक एकाडे, आशिष शर्मा, श्रीरंग गुजरे, नीरज चोरले, सुरज शर्मा या १५ सायकलपटूंचा सहभाग आहे. प्रवासादरम्यान सायकलस्वारांनी ना. नितीन गडकरी यांची सुध्दा भेट घेतली होती. तसेच विविध ठिकाणी त्यांनी विविध सामाजिक विषयावर जनजागृती केली.
सायकल चालविल्याने पेट्रोल व डीझलची बचत होऊन प्रदूषणापासून मुक्ती मिळून पर्यावरणाची होणारी हानी थांबत असल्याचे सायकलस्वारांचे म्हणणे आहे.