हेल्मेटविना गाडी चालविणाऱ्या दाेन जणांनी अपघातात गमाविला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:10+5:302021-07-29T04:41:10+5:30
जिल्ह्यात गतवर्षात चारचाकी वाहनांचे ७, तर माेटारसायकलचे १५ अपघात घडले. या अपघातांमध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे. ...
जिल्ह्यात गतवर्षात चारचाकी वाहनांचे ७, तर माेटारसायकलचे १५ अपघात घडले. या अपघातांमध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लाखाे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
............
ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना
काेराेनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद असल्याने हे धूळखात पडलेले आहेत. तरीसुध्दा वाशिम शहरामध्ये शहर वाहतूक शाखेतर्फे याचा २०२०मध्ये वापर करण्यात आला हाेता. ब्रेथ ॲनालायझरला असलेली नळी एकदा वापरल्यानंतर ती नष्ट केली जात हाेती. परंतु सद्यस्थितीत याचा वापर बंद आहे.
.............
हेल्मेट नसल्याने गेला २ जणांचा जीव
हेल्मेटचा वापर न करता भरधाव वेगाने वाहन चालवून वाशिम शहरातील लाखाळा रस्त्यावरील संत निरंकारी भवनाजवळ एका वाहनचालकाचा मृत्यू झाला हाेता, तर एक जण जखमी झाला हाेता.
वाशिम शहरातील जागमाथा परिसरातही एका जणाचा मृत्यू झाला हाेता.
वाहन चालवितांना माेबाईलचा वापर केल्याप्रकरणी ४१ जणांवर कारवाई केली.