मनसेचे वाशिम बाजार समितीसमोर ‘डफडे बजाओ’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:19 AM2017-11-04T02:19:00+5:302017-11-04T02:19:35+5:30
वाशिम : शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याबाबत तसेच तातडीने कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी मनसे व शेतकर्यांतर्फे ३ नोव्हेंबरला वाशिम बाजार समितीसमोर डफडे बजओ आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याबाबत तसेच तातडीने कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी मनसे व शेतकर्यांतर्फे ३ नोव्हेंबरला वाशिम बाजार समितीसमोर डफडे बजओ आंदोलन केले.
आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्ते वाहनाद्वारे बाजार समितीसमोर पोहोचले. तेथे विविध घोषणा देत डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व मनसेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस किशोर मोरे यांच्यासह अमोल लुलेकर, सुभाष राऊत, अशोक नाईकवाडे, रवी वानखडे, शिवा इंगोले, सतीश जाधव, नितीन शिवलकर, अशोक इंगळे, मनोज खडसे, चंद्रशेखर वाकळे, देवा बारसे, धनंजय सोनटक्के, अनिल शिंदे, सोनु इंगोले, महादेव भस्मे, माणिक राठोड, बालाजी मोरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.