जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट; गर्दीमुळे संसर्गाचा धाेका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:00+5:302021-08-29T04:39:00+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : जिल्ह्यात मागील काही दिवसात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांचे प्रमाण माेठ्या प्रमाणात घटले आहे. हे जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ...
नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्ह्यात मागील काही दिवसात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांचे प्रमाण माेठ्या प्रमाणात घटले आहे. हे जिल्हावासीयांसाठी दिलासादायक असले तरी काेराेनाचा धाेका टळला नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तरी नागरिक मात्र काेणत्याही नियमांचे पालन करीत नसल्याने जागाेजागी हाेत असलेली गर्दीमुळे काेराेना संसर्गाचा धाेका वाढला आहे.
गत आठवडाभरात जिल्ह्यात दरराेज १ किंवा दाेन काेराेना संसर्गाची नाेंद झाली आहे. मागील महिन्याभरात रुग्ण व मृत्युसंख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे.
काेराना संसर्ग घट झाल्याने सर्व स्तरावरील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.
निर्बंध शिथिल केल्या जात असले तरी काेराेना संसर्गाचा धाेका अजून टळला नसल्याने नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गर्दी टाळण्याच्या आवाहनाला तर नागरिकांनी केराची टाेपली दाखविली असल्याचे चित्र शहरांमधील गर्दीवरून दिसून येत आहे.