महामार्गाच्या गौणखनिजासाठी धरणाचे खोलीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:42 PM2019-08-23T14:42:59+5:302019-08-23T14:43:04+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची पूर्तता करण्यासाठी आदर्श गाव साखराने पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची पूर्तता करण्यासाठी आदर्श गाव साखराने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत गावातील धरणाचे खोलीकरण करण्यात येत असून, गेल्या दहा दिवसांत या धरणामधून कंत्राटदार कंपनीने हजारो ब्रास मुरुम खोदून नेला आहे. त्यामुळे धरणाची खोली वाढून जलसाठ्यात अधिक भर पडणार आहे.
आदर्श गाव साखराने गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची अनेक कामे करून राज्यातील गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावकरी आणि ग्रामपंचायतीसह जलमित्र सुखदेव इंगळे यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली. त्यामुळेच गावातील पाणीटंचाई हद्दपार झालीच शिवाय शेतकरीही सिंचन करून सुजलाम, सुफलाम होत आहेत. मागील उन्हाळ्यात ग्रामपंचायतने गावातील शेतकऱ्यांच्याच सहकार्याने धरणातील हजारो ब्रास गाळाचा उपसाही केला आहे. त्यामुळे या धरणाची खोली बºयापैकी वाढली. आता पावसाने उसंत घेतल्याने आणि धरणात जलसाठा नसल्याने खोलीकरणाच्या कामाला वाव आहे. त्यातच वाशिम-मंगरुळपीर राष्ट्रीय महामार्गासाठी गौणखनिजाचीही गरज आहे. ही बाल क्षात घेत गावकरी आणि ग्रामपंचायतने महामार्गाच्या गौणखनिज पूर्ततेसाठी गावातील धरणाचे खोलीकरण करण्याचे ठरविले आणि तशी बोलणी करून महामार्गाच्या कं त्राटदार कंपनीला धरणाचे खोलीकरण करण्याची परवानगी दिली. गेल्या दहा दिवसांपासून या कामाला प्रारंभ झाला असून, या अंतर्गत आजवर हजारो ब्रास मुरुम कंत्राटदार कंपनीने खोदून नेला आहे. जेसीबी, पोकलन मशीनच्या आधारे हे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामालाही आधार झाला असुन, पावसाचे अधिकाधिक पाणी या धरणात साठून शेतकºयांचे सिंचन वाढेल, तसेच भावी काळातील पाणीटंचाईवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.