उमरा, देपुळच्या ४० शेतकऱ्यांच्या शेतात वारा धरणाचे अतिरिक्त पाणी घुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:16 PM2018-07-28T18:16:09+5:302018-07-28T18:17:24+5:30

dam water in Umra, Depul's 40 farmers' fields entered | उमरा, देपुळच्या ४० शेतकऱ्यांच्या शेतात वारा धरणाचे अतिरिक्त पाणी घुसले

उमरा, देपुळच्या ४० शेतकऱ्यांच्या शेतात वारा धरणाचे अतिरिक्त पाणी घुसले

googlenewsNext
ठळक मुद्दे ८१० एकर जमिनीपैकी उमरा येथील ३० व देपूळच्या १० शेतकऱ्यांच्या शेतात अतिरिक्त  जमिनी बाधीत झाल्या. प्रकल्पातील अतिरिक्त पाणी शेतात आल्याने उमरा व देपूळ येथील ४० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ (वाशिम) : यावर्षी धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने वारा जहॉगीर सिंचन प्रकल्प १०० टक्के भरला असून, याच प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी उमरा (शम.), देपूळ येथील ४० शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. दरम्यान, २०१५ पासून अतिरिक्त पाणी घुसुन बाधीत झालेल्या जमिनीची नुकसानभरपाई ४० शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.
वार जहॉगीर सिंचन प्रकल्पाचे बांधकाम लघु पाटबंधारे विभाग वाशिमच्या अधिपत्याखाली २०१५ मध्ये पूर्ण झाले. यामध्ये संपादीत केलेल्या ८१० एकर जमिनीपैकी उमरा येथील ३० व देपूळच्या १० शेतकऱ्यांच्या शेतात अतिरिक्त  जमिनी बाधीत झाल्या. यातील उमरा शिवारातील २७ शेतकºयांच्या जमिनीची संयुक्त मोजणी झाली; परंतु तेव्हापासुन या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरळ खरेदीचे मुल्यांकन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाशिमच्या कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. दरम्यान उमºयाचे शेतकरी हरीभाऊ  कºहाळे यांच्यासह १४ लोकांनी जमिनीचा पेरा, कागदपत्राप्रमाणे हंगामी बागायतीचे दर देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे  केली होती. अद्याप हा प्रश्न लालफितशाहीत अडकलेला आहे. मुल्यांकनाचे प्रस्ताव केव्हा मार्गी लागतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, यावर्षी पावसाच्या पाण्यामुळे वारा जहॉगीर प्रकल्प तुडूंब भरला आहे. प्रकल्पातील अतिरिक्त पाणी शेतात आल्याने उमरा व देपूळ येथील ४० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनीची संयुक्त मोजणी लघु पाटबंधारे विभाग वाशिमतर्फे अद्याप करण्यात आली नाही. याबद्दल शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.

उमरा (शम.) येथील मुल्यांकन प्रस्ताव माझ्या टेबलवर आहे. कार्यालयीन इतर कामे संपल्यावर त्याकडे लक्ष देतो. ज्या शेतकºयांकडे  रोहयो सिंचन कराच्या पावत्या असतील त्यांना हंगामी बागायतीचे दर देता येतील.
- शरद जावळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी उपविभागीय, वाशिम.

Web Title: dam water in Umra, Depul's 40 farmers' fields entered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.