बंधाऱ्याचे काम अपूर्ण; शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:56+5:302021-06-24T04:27:56+5:30
गणेशपूर येथील गट नं. ४ / ३ मधील शेती क्षेत्र २ हे. ४० आर शेतजमीन अर्जदाराचे वहितीत व ...
गणेशपूर येथील गट नं. ४ / ३ मधील शेती क्षेत्र २ हे. ४० आर शेतजमीन अर्जदाराचे वहितीत व ताब्यात आहे. या जमिनीत मागील वर्षी एप्रिल - मे २०२१ मध्ये जलसंधारण विभाग मंगरूळपीरमार्फत बांध करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून बंधारा व्यवस्थित केला नाही. बंधाऱ्यामध्ये आज रोजीसुद्धा भरपूर माती असून संपूर्ण शेतात गिट्टी, डस्ट पडलेली आहे. १० जून २०२१ रोजी रात्री व १२ जून २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरहू बंधारा पूर्णपणे न बांधल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी शेतातून वाहिले आहे. त्यामुळे जमीन खरडून गेली असून पेरणीयोग्य राहिलेली नाही. त्यामुळे यावर्षीच्या पेरणीच्या हंगामात सदर शेतकऱ्याला पेरणी करता आली नाही. शेतात पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे. जलसंधारण विभागाने पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण केले नाही व बंधाऱ्यामधील माती व गाळ व्यवस्थित उपसला नाही. यामुळे शेतीचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी शंकर खाेडके यांनी संबंधितांकडे केली आहे.