पीक विमाधारकांच्या नुकसानाचा अहवाल विभागस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 03:49 PM2019-12-04T15:49:57+5:302019-12-04T15:50:07+5:30
या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हा कृषी विभागामार्फत विभागस्तरावर पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ३ हजार ४०० शेतकऱ्यांच्या १ लाख ७२ हजार ६५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद असून, या अहवालाचे परिक्षण करून पीकविमाधारक शेतकºयांना निकषानुसार पीकविमा मंजूर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ८ नोव्हेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण केले. तथापि, या पंचनाम्यानंतर पीक विमा न भरणाºया आणि पीक विमा भरणाºया शेतकºयांचे स्वतंत्र अहवाल तयार करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख ५२ हजार १९४ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ६५ हजार ५४८ शेतकºयांच्या २८ हजार २६७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख ३७ हजार ८५२ शेतकºयांच्या १ लाख ४३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या १ लाख ७२ हजार ६५ पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल विविध प्रपत्रात तयार करावा लागल्याने अहवाल तयार होण्यासाठी तब्बल २० दिवस लागले. या अहवालानुसार अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात उभ्या पिकांचे क्षेत्र वेगळे असून, काढणी पश्चात पिकांचे क्षेत्र वेगळे आहे. या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे.
विभागस्तरावर होणार पडताळणी
वाशिम जिल्ह्यात पीकविमाधारक शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे क्षेत्र आणि शेतकºयांची संख्या, तसेच पिकांच्या माहितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर या अहवालाची विभागीय आयुक्तांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीनंतरच शासनाकडे हा अहवाल पाठविण्यात येणार आहे. शेतकºयांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीकविमा मंजूर केला जाणार असून, सोयाबीन पिकाच्या शंभर टक्के नुकसानापोटी शेतकºयांना एकरी ४३ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.