कुत्तरडोहचे धरण, कालव्याचे काम निकृष्ट!
By admin | Published: April 6, 2017 08:38 PM2017-04-06T20:38:24+5:302017-04-06T20:38:24+5:30
वाशिम- मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह धरण व कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार गावकºयांनी पाटबंधारे विभाग अधिकाºयांकडे केली आहे.
Next
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मौजे कुत्तरडोह येथील धरणाच्या कॅनालचे आणि सांडव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करुन त्याचा अहवाल देण्याची मागणी अरुण चिंतामण धंदरे व महादेव सिताराम धवसे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे गुरुवार, ६ एप्रिल रोजी केली.
धरण व कालव्याच्या बांधकामावर जास्तीत जास्त नाल्यामधील रेती माती मिक्स करुन वापरण्यात आली आहे. तसेच कालव्याचे खडीकरण देखील निकृष्ट दर्जाचे आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी; अन्यथा येत्या १७ एप्रिलपासून उपोषण करू, असा इशाराही संबंधितांनी दिला आहे.