कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे शेतजमिनीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:22+5:302021-07-16T04:28:22+5:30
^^^^^^^^^ नदी, नाले तुडुंब : दमदार पावसाचा लाभ वाशिम: जिल्ह्यात पाणी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या ...
^^^^^^^^^
नदी, नाले तुडुंब : दमदार पावसाचा लाभ
वाशिम: जिल्ह्यात पाणी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत सहभागी ६१ गावात जलसंधारणाची कामे केली जात असून, खोलीकरण झालेले नदी, नाले दमदार पावसामुळे तुडुंब भरले असून, या पाण्याचा फायदा शेतकरी, ग्रामस्थांनाही होणार आहे.
^^^^^^^^^^^^
रस्त्यावर साचले गटार
वाशिम: येथील उड्डाण पुलाचे काम सुरू असून, या पुलाच्या बाजूला वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्याने येथे गटार साचत असून, चालकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
----------------
इदगाहच्या रस्त्यांचे पुनर्निर्माण
वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथे इदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था वाईट झाली होती. या रस्त्यांचे काम करण्याची मागणी मुस्लीम बांधवांकडून सुरू होती. याची दखल जि.प. प्रशासनाने घेऊन कामांना सुरुवात केली आहे.
-----------------
पावसामुळे नद्या फुगल्या !
वाशिम: जिल्ह्यात गुरुवार १० जूनपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाल्यांना पूर आलेच शिवाय बहुतांश नद्यांचे पात्र पाण्याने फुगल्याचे चित्र दिसून आले. संभाव्य परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-----------------
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या अंतर्गत शुक्रवारी वाशिम-मंगरूळपीर मार्गावर अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली.