पावसाच्या पाण्याने शेतजमिनीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:16+5:302021-06-17T04:28:16+5:30
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रोहना फाटा ते बोरव्हा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रोहना फाटा ते बोरव्हा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम करीत असताना, पावसाचे पाणी वाहून जाण्याची कुठलीच ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनुराग देशमुख यांची रोहना शेतशिवारात १४.२२ हेक्टर आर. शेतजमीन असून, १० जून रोजी झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात शिरून जमीन खरडून गेली. तार कुंपण जमीनदोस्त झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत कंत्राटदार डॉ.गणेश राठी, मंगरुळपीर यांना फोन करून माहिती दिली. नुकसानभरपाई देण्याचे त्यांनी कबूल केले. मात्र, तेव्हापासून त्यांनी संपर्कच केला नाही, असे अनुराग देशमुख यांनी निवेदनात नमूद केले. संबंधित कंत्राटदाराचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.