भाजीपाला पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:41 AM2021-05-10T04:41:08+5:302021-05-10T04:41:08+5:30

.................. नाल्यावरील पुलाची दुरवस्था देपूळ : सुपखेलानजीकच्या नाल्यास पावसाळ्यात आलेल्या पुराने या नाल्यावरील पूल खरडून गेला. यामुळे खड्डे पडले ...

Damage to vegetable crops | भाजीपाला पिकांचे नुकसान

भाजीपाला पिकांचे नुकसान

Next

..................

नाल्यावरील पुलाची दुरवस्था

देपूळ : सुपखेलानजीकच्या नाल्यास पावसाळ्यात आलेल्या पुराने या नाल्यावरील पूल खरडून गेला. यामुळे खड्डे पडले असून, येथे अपघाताची भीती आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

........................

राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे

मालेगाव : गत तीन वर्षांपासून मालेगाव- शिरपूर- रिसोड-सेनगाव- हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण करणे सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे असल्याचे दिसून येत आहे.

.............................

पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन

अनसिंग : मे महिन्यात पाणीटंचाई जाणवणार असल्याचे गृहीत धरून स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने पाणी बचतीचे प्रयत्न केले जात आहेत.

.....................

आवक घटल्याने ज्वारीचा दर वाढला

वाशिम : जिल्ह्यात संकरित ज्वारीचे लागवड क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. यामुळे उत्पादन कमी होऊन बाजारात होणारी आवक घटल्याने दरवाढ झाली आहे. बुधवारी वाशिम येथे ज्वारीला प्रतिक्विंटल १,५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला.

.....................

अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

वाशिम : येथून कनेरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गत काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू असून, याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मनीष गोटे यांनी जिल्हा वाहतूक शाखेकडे तक्रार केली.

.......................

वीज रोहित्र बंद; सिंचन प्रभावित

रिठद : रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणची विद्युत रोहित्रे नादुरुस्त आहेत. यामुळे सिंचन प्रक्रिया प्रभावित होत आहे. परिणामी, भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

............................

बीएसएनएलची सेवा अनियमित

जउळका : गेल्या आठवडाभरापासून परिसरात बीएसएनएलची दूरसंचार सेवा अनियमित आहे. वारंवार ही सेवा ठप्प होत असल्याने बँक व्यवहारांसह अन्य स्वरूपातील अडचणी जाणवत आहेत.

......................

ग्राहकांना वारेमाप वीज देयके

इंझोरी : गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज देयके दिली जात आहेत. त्यात काहींना ४ हजारांपासून १० हजारांपर्यंतचे देयक येत असल्याने ग्राहकांना जोरदार शॉक बसला आहे.

....................

इंझोरीत नाल्यांची सफाई

आसेगाव : गावात नाल्या घाणीने खच्च भरल्या असून, रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत ग्रामपंचायतच्या वतीने शनिवारपासून नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे.

................

नियमांचे उल्लंघन; वाहनांवर कारवाई

वाशिम : दुचाकी, चारचाकी वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत २०० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

...........................

गरजू कुटुंबास सानप यांची मदत

रिसोड : गल्लोगल्ली फिरून लहान मुलांना उंटाची सवारी घडविणाऱ्या कुटुंबावर कोरोनामुळे मात्र उपासमारीची वेळ ओढवली आहे. ही बाब लक्षात घेऊन जि.प.चे माजी कृषी सभापती विश्वनाथ सानप यांनी सदर कुटुंबाला रविवारी अन्नधान्याची मदत करून सामाजिक दायित्व जोपासले.

Web Title: Damage to vegetable crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.