झाडांमुळे तलावाच्या भिंतीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:37 AM2021-04-26T04:37:45+5:302021-04-26T04:37:45+5:30
मजलापूर शिवारातील या तलावावर वनोजा, माळशेलू, शेंदूरजना येथील शेतकर्यांची जवळपास ३०० एकर शेती सिंचन होते. सदर तलाव हा रब्बी ...
मजलापूर शिवारातील या तलावावर वनोजा, माळशेलू, शेंदूरजना येथील शेतकर्यांची जवळपास ३०० एकर शेती सिंचन होते. सदर तलाव हा रब्बी पिकांसाठी अतिशय फायद्याचा आहे. आज घडीला तलावात अत्यल्प जलसाठा असून, तलावाच्या भिंतीवर दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या वृक्षांनी संपूर्ण भिंती व्यापून गेली आहे. त्यामुळे भविष्यात सदर वृक्षाच्या मुळा खोलपर्यंत गेल्यास अतिवृष्टी झाली, तर तलाव फुटण्याची भीती आहे. अशाच प्रकारे शेंदुरजना मोरे शिवारातील तलाव १६ जुलै, २०२० रोजी भिंतीवर वाढलेल्या वृक्षांमुळे भिंतीला तडा जाऊन तलाव फुटला होता. त्यामुळे या तलावावर यंदा शेंदुरजना व नांदखेडा येखील शेतकर्यांना रब्बी पिकांपासून वंचित राहावे लागेल. हाच प्रकार मजलापूर तलावावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी तलावाच्या भिंतीवर वाढलेली झाडे विनाविलंब तोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे.