अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडले जळीत हत्याकांड!

By Admin | Published: March 12, 2017 01:56 AM2017-03-12T01:56:00+5:302017-03-12T01:56:00+5:30

माळेगाव येथील घटनेचा पर्दाफाशय पाच आरोपींना अटक

Dangers of suspected immoral relations were burnt! | अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडले जळीत हत्याकांड!

अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडले जळीत हत्याकांड!

googlenewsNext

वाशिम, दि. ११- तालुक्यातील माळेगाव शिवारात एका इसमाचा मृतदेह ९ मार्च रोजी जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेचा अवघ्या दोन दिवसात तपास पूर्ण करून ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या पथकाने दूधखेडा (ता.जि.वाशिम) येथील पाच आरोपींना अटक केली आहे. सदर घटना अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दस्तापूर (ता. मंगरूळपीर) येथील राम विश्‍वनाथ केंगार (वय ५0) हा इसम दूधखेडा (ता.जि. वाशिम) येथील युवराज देवीदास जाधव यांच्या शेतामध्ये गेल्या तीन वर्षांपासून मजुरीचे काम करीत होता. मृत राम केंगार हा जाधव यांच्या शेतातील काम करून त्यांच्याच शेतामध्ये वास्तव्य करीत होता. जेवनाचा डब्बा आणण्यासाठी केंगार याचे जाधव याचे घरी येणे-जाणे सुरू असायचे. दरम्यान, केंगार याच्यावर जाधव यांना एके दिवशी संशय आला. ४ मार्च रोजी केंगार हा नेहमीप्रमाणे शेतामध्ये झोपेची तयारी करू लागला. त्यावेळी संतप्त झालेला शेतमालक युवराज जाधव याने प्रकाश देवीदास जाधव, प्रेम देवीदास जाधव व मोहन देवीदास जाधव यांचे सहकार्य घेऊन केंगार याचा गळा दाबून त्याला जीवाने मारून टाकले.
त्यानंतर त्याचा मृतदेह आणण्यासाठी गावातीलच नितिन बळीराम जाधव या ऑटोचालकाची मदत घेऊन केंगार याचा मृतदेह माळेगाव शेतशिवारात शनिवार, ४ मार्च रोजी आणून टाकला. दुसर्‍या दिवशी युवराज जाधव व प्रकाश जाधव यांनी मृतदेहाची ओळख मिटविण्यासाठी त्याला जाळून टाकण्याचा कट रचला. त्यानुसार युवराज व प्रकाश यांनी पेट्रोलची कॅन घेऊन मोटारसायकलने मृतदेह टाकून दिलेले ठिकाण गाठले व मृतदेहाच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला; परंतु पेट्रोल टाकत असताना युवराज जाधव हा गंभीररीत्या भाजल्या गेला तर प्रकाश जाधव हा किरकोळ जळाला होता. हे दोघे जळाल्यामुळे व त्यांच्या शेतातील मजूर केंगार गायब झाल्यामुळे या घटनेची वार्ता झपाट्याने गावात पसरली व ही वार्ता पोलिसांपर्यंंत आल्याने घटना लगेच उघडकीस आली. पोलिसांनी चार भाऊ युवराज, प्रकाश, प्रेम, मोहन व ऑटोचालक नितिन जाधव यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0२/२0१ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास ठाणेदार अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जायभाये, जमादार संजय आमटे, जमादार सरकटे, राजेश निर्बाण, श्रीवास्तव लालमणी, नागोराव खंडके, शैलेश ठाकूर व अमोल इंगोले यांनी केला.

Web Title: Dangers of suspected immoral relations were burnt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.