कारंज्यात आढळला डेंग्यूचा रुग्ण !
By admin | Published: August 11, 2016 01:43 AM2016-08-11T01:43:18+5:302016-08-11T01:43:18+5:30
वातावरणातील बदल कारणीभूत.
कारंजा लाड(जि. वाशिम), दि १0 : गत काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे विविध आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. परीणामी व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी-खोकला,ताप यासारख्या व्हायरल आजारांपाठोपाठ आता डेंग्यूनेही शहरात आगमन केले आहे. स्थानिक बंजारा कॉलनील रहिवाशी असलेला साडे तीन वर्षीय शुभम मांजरे या मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या लहान बालकांसह वयोवृद्धांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्दी, खोकला, थंडीताप, अंगदुखी, घसा खवखवणे तसेच डेंग्यू लक्षणे जाणवत आहे. प्रामुख्याने लहान बालकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात किरकोळ आजारांची दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी दाखल होत आहेत.