दापुरी-वाघी खु. गोवर्धन रस्त्यावर पडलेत जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:09+5:302021-06-22T04:27:09+5:30
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित होते; पण अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांना व ...
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित होते; पण अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. मालेगाव- रिसोड या राज्य मार्गापासून रिसोड तालुक्यातील दापुरी ते वाघी खुर्द या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, काही ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे, त्यामुळे रस्त्यावर चिखल पसदापुरी-वाघी खु-गोवर्धन रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज येत नाही, तसेच पाऊस आल्यावर या रस्त्यावर चिखल होऊन तिथे वाहने घसरतात, फसतात. परिणामी लहान- मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे,
या रस्त्याची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी व या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.