मानोरा तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर गावांत भीषण पाणी टंचाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:53 PM2018-01-16T13:53:39+5:302018-01-16T13:55:46+5:30
मानोरा : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे.
मानोरा : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे. विहीरी कोरड्या पडल्या, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविलेले टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव महिन्यापासुन धुळखात आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पं.स.सदस्या रेखा पडवाळ जि.प.सदस्य सचिन रोकडे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व्यतिरिक्त इतरही गावांना पाणी समस्येने ग्रासले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यापुर्वी हिवाळ्याच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. गावाची तहान भागविण्यासाठी अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजनाचे पाणी देण्यात आले. परंतु गावे टेकडीवर असल्यामुळे या गावांना पाणी पुरवठा होत नाही ही योजना केवळ शोभेची वस्तु बनली आहे. जलमय संकल्नेतुन या गावाची वाटर न्युट्रल म्हणुन नोंद आहे.परंतु याबाबत शासनाची कमालीची दिशाभुल झाली आहे. ढोणी या गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एकही काम झाले नाही तरी सुध्दा वाटर न्युट्रल म्हणुन ढोणी, गावाची नोंद आहे.सदर गावाची तहान भागविण्यासाठी एमआरईजीएस मधुन सार्वजनिक विहीरी उज्वलनगर , ढोणी येथे केल्या आहेत. परंतु विहीरींना गाावला विहीरीवरुन पाणी पुरवठा करण्यासाठी आदिवासी उपाय योजने अंतर्गत प्रस्ताव पाठवले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत प्रस्तावीत आहे. तिन्ही गावे कायम टंचाईग्रस्त असल्यामुळे किमान २० वर्षापासून या गावानां टँकरने पाणी पुरवठा होत आहे. या गावी सुध्दा प्रस्तावित टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावीत आहे. या गावाचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याकरिता लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यावतीने होत आहे.
टंचाईग्रसत गावे वाटर न्युट्रलमध्ये कसे - सचिन रोकडे
पाळोदी, ढोणी, उजवलनगर यासह परिसरातील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तरी सुध्दा शासनाची दिशाभुल करुन वाटर न्युट्रल म्हणुन या गावाची नोंद आहे. गेल्या २० वर्षापासुन टँकरने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ही गावे वाटर न्युट्रल कशी असा प्रश्न सचिन रोकडे यांनी उपस्थित केला आहे.