दारव्हा-मानोरा एस.टी. अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:57+5:302021-01-22T04:36:57+5:30
दारव्हा ते मानोरा या मार्गावरील तळप बु., कार्ली, बोरव्हा, नांदगव्हाण, कुरहाड, दत्तापूर, किन्ही राजुरा या गावांमधील लोकांना मानोरा किंवा ...
दारव्हा ते मानोरा या मार्गावरील तळप बु., कार्ली, बोरव्हा, नांदगव्हाण, कुरहाड, दत्तापूर, किन्ही राजुरा या गावांमधील लोकांना मानोरा किंवा दारव्हा येथे यायचे असल्यास दारव्हा डेपोच्या एकमेव एस.टी.चा पर्याय उपलब्ध होता. असे असताना रस्त्याची दुरवस्था झाल्याचे कारण समोर करून ही एस.टी. बंद करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र याच मार्गावर मानव विकास मिशनची एस.टी. सुरू असून, विद्यार्थ्यांची ने-आण करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी मानोरा-दारव्हा ही एस.टी. पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
..................
कोट :
मानोरा ते दारव्हा या मार्गावर काही दिवसांपुर्वी जड वाहने ये-जा करीत होती. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. म्हणूनच एस.टी. फेरी बंद करावी लागली. असे असले तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ना हरकत दर्शविल्यास एस.टी. पुन्हा सुरू करता येईल.
हेमंत चांदुरकर, आगार व्यवस्थापक, दारव्हा
..................
मानोरा-दारव्हा या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. एस.टी. धावणारच नाही इतकाही हा रस्ता खराब नाही. त्यामुळे एस.टी. पुन्हा सुरू करण्यासाठी ना हरकत दिली जाईल.
- एस.पी. राठोड, अभियंता, जि. प. बांधकाम विभाग दारव्हा