वारा जहागीर सरपंचाचा मृतदेह विहिरीत आढळला
By संतोष वानखडे | Updated: September 20, 2023 17:44 IST2023-09-20T17:43:33+5:302023-09-20T17:44:35+5:30
वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे ( ६२ ) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली.

वारा जहागीर सरपंचाचा मृतदेह विहिरीत आढळला
वाशिम : वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे (६२) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. सुगंधाबाई कांबळे या तीन वर्षांपासून वारा जहागीर ग्रामपंचायत सरपंचपदी कार्यरत आहेत. त्यांनी निर्विवाद सरपंच पद सांभाळले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकासात्मक कामे झाली आहेत. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु त्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सूगंधाबाई कांबळे यांचे पती पूंजाजी कांबळे यांचाही मृत्यू वीज पडून तीन वर्षापूर्वी झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी शरद राठोड करीत आहेत.