धडक सिंचन विहिरीची अंतिम मुदत चार दिवसांवर!

By admin | Published: February 7, 2017 03:02 AM2017-02-07T03:02:54+5:302017-02-07T03:02:54+5:30

१0 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू न झाल्यास विहिरी होणार रद्द

The deadline for the dip irrigation well on the four days! | धडक सिंचन विहिरीची अंतिम मुदत चार दिवसांवर!

धडक सिंचन विहिरीची अंतिम मुदत चार दिवसांवर!

Next
शिम, दि. ६- धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या व अद्याप काम सुरु न झालेल्या सिंचन विहिरींचे काम सुरु करण्यास १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विहित मुदतीत काम सुरु न केलेल्या लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरी रद्द होणार आहेत.
धडक सिंचन विहीर योजनेतून जिल्ह्याला ७ हजार ८00 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार ८६२ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. तसेच ४७६ सिंचन विहिरींची कामे प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आली होती; मात्र अनेक वेळा वाढीव मुदत देऊनही अद्याप अनेक पात्र लाभार्थ्यांनी सिंचन विहिरींची कामे सुरु न केल्याने या सिंचन विहिरी रद्द करण्याचे प्रस्तावित होते.
दरम्यान, शेतकर्‍यांना जाणवणार्‍या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ज्यांनी विहिरी मंजूर होऊनही कामे केली नाहीत, अशा शेतकर्‍यांना सिंचन विहिरींची काम सुरु करण्यास १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. आता जे लाभार्थी १0 फेब्रुवारीपयर्ंत सिंचन विहिरींची कामे सुरु करतील, त्यांच्याच सिंचन विहिरी पुनर्जीवित करण्यात येतील. तसेच या मुदतीत काम सुरु न करणार्‍या लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरी रद्द करण्याची धडक कारवाई केल्या जाणार आहे. मुदतीनंतर त्यांचा आक्षेपदेखील विचारात घेतला जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याबाबत कुठलीही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

१५ दिवसांत सुरू झाले केवळ ५0 विहिरींची कामे
जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या ४७६ विहिरींची कामे सुरू करण्यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची बाब रोजगार हमी योजना विभागाने २२ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यास आज रोजी १५ दिवसाचा कालावधी उलटला आहे. असे असताना ४७६ पैकी उण्यापुर्‍या ५0 विहिरींचीच कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली.

Web Title: The deadline for the dip irrigation well on the four days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.