शासकीय रेखाकला परीक्षा आवेदनपत्रक सादर करण्याला मुदतवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:26 IST2019-07-30T15:25:57+5:302019-07-30T15:26:01+5:30
वाशिम : शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शासकीय रेखाकला परीक्षा आवेदनपत्रक सादर करण्याला मुदतवाढ !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूवी आवेदनपत्रक सादर करण्यास २७ जुलै अशी अंतिम मुदत होती.
विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना चालना देण्यासाठी कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला परीक्षा घेतली जाते. सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रातील शासकीय रेखाकला परीक्षेसाठी शाळा, विद्यार्थ्यांकडून आवेदनपत्र मागविले आहेत. आवेदनपत्रक सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्थात २७ जुलैपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आवेदनपत्रक सादर करता आले नाही तसेच काही परीक्षा केंद्रांमध्ये अपूरी बैठक व्यवस्था असल्याने नवीन केंद्रांना मंजूरी देण्याची मागणी समोर आली होती. याची दखल कला संचालनालयाचे (मुंबई) परीक्षा नियंत्रण नागेश वाघमोडे यांनी घेतली असून, ५ आॅगस्टपर्यंत आवेदनपत्रक सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. सहभागी शाळांना आता ५ आॅगस्टपर्यंत संबंधित केंद्राकडे आवेदनपत्रक सादर करावे लागणार आहेत तसेच संबंधित केंद्र प्रमुखांना एकत्रित आवेदनपत्रके १३ आॅगस्टपर्यंत कला संचालनालयाकडे पाठवावी लागणार आहेत. ज्या केंद्रांकडे बैठक व्यवस्थेनुसार नाव नोंदणी पूर्ण झाली असेल तर त्यांनी तातडीने कला संचालनालयाकडे आवेदनपत्रक पाठवावे, अशा सूचना परीक्षा नियंत्रकांनी दिल्या आहेत.
शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार ५ आॅगस्टपर्यंत शाळांमध्ये आवेदनपत्रक स्विकारले जाणार आहेत. शासकीय रेखाकला परीक्षेला बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत शाळांशी संपर्क साधून नोंदणी करावी.
- विठ्ठल सरनाईक,
कला शिक्षक, श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड जि. वाशिम