गटशेती प्रकल्प अहवाल सादर करण्याची अंतीम मुदत ६ आॅक्टोबर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:04 PM2017-10-03T20:04:46+5:302017-10-03T20:05:07+5:30
वाशिम: गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी ‘शेतकºयांच्या गटशेतीस चालना’ ही राज्यपुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

किमान २० शेतकरी समुहाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. हा समूह शेतीचा प्रयोग एक शिवारातील संलग्न भौगौलिक क्षेत्रामध्ये सामुहिकरित्या नियोजनबध्द शेती करणारा असावा. या योजनेतंर्गत सहभागी होणाºया शेतकºयांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १८९० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ६ आॅक्टोबरपर्यंत आपले प्रकल्प अहवाल सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.