१0 महिन्यापासून मानधन थकले
By admin | Published: January 17, 2015 12:38 AM2015-01-17T00:38:00+5:302015-01-17T00:48:42+5:30
मानोरा तालुक्यातील पोषण आहार शिजविणा-या महिलांचे वेतन गत १0 महिन्यांपासून थकले.
मालेगाव (जि. वाशिम ): तालुक्यातील खिचडी शिजविणार्या महिलांचे वेतन गत १0 महिन्यापासून निघाले नसल्याने त्यांच्यावर उपासमार आली आहे. वेतनाअभावी त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवी, त्यांना सकल आहार उपलब्ध व्हावा, कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे या प्रमुख उद्देशाने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. याकरीता खिचडी शिजविणार्या महिला ठेवण्यात आल्या आहेत परंतु गत १0 महिन्यापासून त्यांना मानधनच मिळालेले नाही. आधिच अल्प मानधनावर काम करणार्या या महिलांना तेही वेळेवर मिळत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्वरित मानधन न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊन खिचडी शिजविणे बंद करण्याचा इशारा सदर महिलांना दिला आहे. खिचडी शिजविणार्या महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली असता त्यांना तेथे कोणीच आढळून न आल्याने खाली हात परतावे लागले. यावेळी सीमा लक्ष्मण आंधळे, सचिव शिलाबाई आंधळे, सविता भगत, पूजा गोटे, शांताबाई आगलावे, मंदाबाई इंगळे, इंदुबाई मोटे, धृपताबाई देवळे, शिलाबाई आव्हाळे यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.