आणखी एकाचा मृत्यू; ३८७ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:47+5:302021-04-23T04:43:47+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू तर ३८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २२ एप्रिल ...

Death of another; 387 corona positive! | आणखी एकाचा मृत्यू; ३८७ कोरोना पॉझिटिव्ह !

आणखी एकाचा मृत्यू; ३८७ कोरोना पॉझिटिव्ह !

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू तर ३८७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २३,७५८ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार आणखी एका जणाचा मृत्यू झाला तर ३८७ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, अंबिका नगर येथील १, कारागृह परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ५, सिव्हिल लाईन्स येथील ४, दत्त नगर येथील १, आययूडीपी कॉलनी येथील २, जैन भवन परिसरातील ३, लाखाळा येथील ४, माधव नगर येथील १, नंदनवन कॉलनी येथील १, नवीन आययूडीपी कॉलनी येथील २, पंचशील नगर येथील १, साईलीला नगर येथील २, समता नगर येथील १, संकट मोचन नगर परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील ४, सुंदरवाटिका येथील १, टिळक चौक येथील १, तिरुपती सिटी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे १६, अनसिंग येथील ३, असोला येथील ३, बाभूळगाव येथील १, धुमका येथील १, गोंडेगाव येथील १, गुंज येथील १, जांभरुण येथील ३, जांभरुण परांडे येथील १, काजळंबा येथील १, कार्ली येथील १, काटा येथील १२, किनखेडा येथील १, कोंडाळा येथील २, नागठाणा येथील १, सावरगाव येथील १, सोंडा येथील १, सुपखेला येथील १, सुराळा येथील ३, तामसाळा येथील १, तोंडगाव येथील १, उकळीपेन येथील १, वाघजळी येथील ६, वाई येथील १, वारा जहांगीर येथील १, वारला येथील १, झाकलवाडी येथील ३, मालेगाव शहरातील वाॅर्ड क्र. ४ येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १७, बोर्डी येथील १, ढोरखेडा येथील ४, डोंगरकिन्ही येथील १, एकांबा येथील १, झोडगाव येथील १, कळंबेश्वर येथील १, खिर्डा येथील २, कोठा येथील ३, मैराळडोह येथील ३, मेडशी येथील ४, किन्हीराजा येथील १, जऊळका समृद्धी कॅम्प येथील १, सावरगाव जहांगीर येथील १, शिरपूर येथील ६, सोनाळा येथील १, सुकांडा येथील १, वारंगी येथील १, वसारी येथील २, झोडगा येथील २, अमानी येथील १, डव्हा येथील १, आमखेडा येथील १, डव्हा कॅम्प येथील १, रिसोड शहरातील अकोला बँक परिसरातील १, अमरदास नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, लोणी फाटा येथील ६, मालेगाव नाका येथील १, पंचायत समिती परिसरातील १, शिवाजी चौक येथील १, शिवाजी नगर येथील ३, शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, बेलखेडा येथील ८, चिंचाबाभर येथील १, चिंचखेडा येथील २, हराळ येथील २, करडा येथील १, करंजी येथील ४, कावन येथील १, लिंगा येथील ५, मांगुळ झनक येथील ४, नंधाना येथील ३, निजामपूर येथील १, पेडगाव येथील १, रिठद येथील ४, शेलगाव येथील १, शेलू खडसे येथील १, वनोजा येथील १, वाकद येथील १, देऊळगाव बंडा येथील १, कोयाळी जाधव येथील २, कोलगाव येथील २, चिंचाबा पेन येथील १, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसरातील १, धनगरपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील १, मंगलधाम येथील १, नगर परिषद परिसरातील १, नालंदा नगर येथील १, पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शिंदे कॉलनी येथील २, शिवणी रोड परिसरातील १, बाबरे ले-आऊट येथील १, राधाकृष्ण नगरी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ७, चांभई येथील १, चिंचाळा येथील १, चोरद येथील १, दाभा येथील १५, धानोरा येथील १, घोटा येथील १, गोगरी येथील १, करंजी येथील २, कोठारी येथील १, लाठी येथील १, मोहरी येथील १, निंभी येथील ५, पेडगाव येथील २, सावरगाव येथील १, शेलगाव येथील १, शेलूबाजार येथील २, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील १, मसोला येथील २, नांदखेडा येथील ४, वनोजा येथील १, जोगलदरी येथील २, कारंजा शहरातील निवारा कॉलनी येथील १, बायपास रोड परिसरातील १, कांचन विहार कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील ३, शिवाजी नगर येथील १, टेलिकॉम कॉलनी येथील १, विद्याभारती कॉलनी येथील १, यशोदा नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील १, भामदेवी येथील १, धनज खु. येथील १, कामरगाव येथील ३, हिंगणवाडी येथील १, काजळेश्वर येथील १, खानापूर येथील ३, माळेगाव येथील ११, रहाटी येथील २, मानोरा शहरातील १, अजनी येथील १, म्हसनी येथील १, चौसाळा येथील ४, गोस्ता येथील २, हिवरा खु. येथील १, कोंडोली येथील ६, कुपटा येथील १, वातोड येथील १, विठोली येथील १, धानोरा येथील ३, पोहरादेवी येथील १, सोयजना येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १६ बाधिताची नोंद झाली असून २९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

००००

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह २३,७५८

ॲक्टिव्ह ४०४५

डिस्चार्ज १९,४६७

मृत्यू २४५

Web Title: Death of another; 387 corona positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.