आणखी एकाचा मृत्यू; ४९१ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:24+5:302021-05-09T04:42:24+5:30
वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने, शहरवासीयांची चिंता वाढत आहे. शनिवारीही वाशिम तालुक्यात १२३ जण कोरोनाबाधित आढळून आले. आणखी ...
वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने, शहरवासीयांची चिंता वाढत आहे. शनिवारीही वाशिम तालुक्यात १२३ जण कोरोनाबाधित आढळून आले. आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. एकूण ४९१ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२३, मालेगाव तालुक्यातील ५३, रिसोड तालुक्यातील ५४, मंगरुळपीर तालुक्यातील ७२, कारंजा तालुक्यातील ६८ आणि मानोरा तालुक्यात ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३४ बाधितांची नोंद झाली असून, ५२४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
०००००००००००
पोहरादेवीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले
मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे दोन महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. आता पुन्हा शनिवारी पोहरादेवी येथे २१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गावात तळ ठोकून आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथेही १८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले.
००
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह ३१,६०५
ॲक्टिव्ह ४,४७७
डिस्चार्ज २६,७९५
मृत्यू ३३२
००००००००००