शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 03:30 PM2019-06-11T15:30:15+5:302019-06-11T15:35:27+5:30

मानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला.

The death of the farming father and son by electric shock while working in the field | शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे दत्ता गवळी व विजय गवळी अशी मृतक पिता-पुत्रांची नावे आहे. तारांमध्ये विजेचा प्रवाह आल्याने विजयला विद्युत धक्का बसला. मुलाला स्पर्श करताच विजेचा धक्का लागून वडीलसुध्दा जागीच कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला. या दुर्देवी घटनेत शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील सावळी येथे ११ जून रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. दत्ता गवळी व विजय गवळी अशी मृतक पिता-पुत्रांची नावे आहे. 
सावळी येथील पोलीस पाटील गोपाल शेळके यांनी मानोरा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सावळी येथील शेतकरी दत्ता मारोती गवळी (५०) व मुलगा विजय दत्ता गवळी (२५) हे ११ जून रोजी सकाळी शेतात शिमला मिरचीला पाणी देण्यासाठी गेले होते. मिरची व्यतिरिक्त दोडक्याचे पीकही ते घेतात. दोडक्याच्या वेलीला आधार देण्यासाठी सभोवताल तार बांधण्यात आल. दोडक्याचे वेल सरळ करण्याकरिता विजय गेला असता, बांधलेल्या तारांमध्ये विजेचा प्रवाह आल्याने विजयला विद्युत धक्का बसला. विद्युत धक्क्यामुळे विजय हा जागीच कोसळल्याचे पाहून वडील दत्ता गवळी यांनी विद्युत रोहित्राच्या  बॉक्समधील फ्यूज काढुन मुलाकडे धाव घेतली. फ्यूज काढल्यानंतरही  तारामध्ये वीजप्र्रवाह कायमच राहिला. मुलाला स्पर्श करताच विजेचा धक्का लागून वडीलसुध्दा जागीच कोसळले. ही बाब नजीकच्या शेतात उपस्थित असलेल्या अन्य शेतकºयांच्या लक्षात येताच त्यांनी विजेचा प्रवाह बंद करून  पिता-पुत्राला वाचविण्यासाठी दिग्रस येथे उपचारासाठी हलविले. तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिस पाटील गोपाल शेळके यांनी मानोरा पोलिसांना माहिती दिली. विजेच्या धक्क्याने पितापुत्राचा मृत्यु झाल्याने सावळी गावावर शोककळा पसरली. घटनेची वार्ता समजताच अनेकांनी दिग्रसच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उल्हास वाघ, अभियंता जितेंद्र दामोदर, कनिष्ठ अभियंता गोपाल साबळे घटनास्थळी पंचनाम्याकरिता दाखल झाले.

Web Title: The death of the farming father and son by electric shock while working in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.