ट्रकखाली दबून मजुराचा मृत्यू

By admin | Published: May 9, 2017 02:12 AM2017-05-09T02:12:43+5:302017-05-09T02:12:43+5:30

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्याखाली दबून आकाश रमेश घागरमाळी (वय ३0 वर्षे) या मजुराचा मृत्यू झाला.

The death of the laborer under the truck | ट्रकखाली दबून मजुराचा मृत्यू

ट्रकखाली दबून मजुराचा मृत्यू

Next

मंगरुळपीर : तालुक्यातील कासोळा फाट्यानजिक औरंगाबादवरून पोकलँड जेसीबी घेऊन मंगरुळपीरकडे येणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्याखाली दबून आकाश रमेश घागरमाळी (वय ३0 वर्षे) या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, ८ मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वाशिमकडून मंगरुळपीरकडे येणारा ट्रक (क्रमांक सी.जी.0४ - जे ५५१२) हा पोकलँड जेसीबी मशीन घेऊन येत होता. यादरम्यान कासोळा फाटा परिसरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक विरूद्ध दिशेने उलटला. या ट्रकच्या खाली दबून आकाश घागरमाळी (रा. कानसुरी, जि.परभणी) या मजुराचा मृत्यू झाला; तर इतर काही लोकांना किरकोळ मार लागला. याबाबत प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध कलम ३0४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: The death of the laborer under the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.