शेतात पाणी दयायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By नंदकिशोर नारे | Published: March 5, 2024 05:00 PM2024-03-05T17:00:44+5:302024-03-05T17:02:37+5:30
सदर बाब ५ मार्च राेजी उघडकीस आली.
नंदकिशोर नारे,वाशिम : शेतात हरभऱ्याला पाणी द्यायला गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुचाकी अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शेत शिवारात ४ मार्चचे रात्री दरम्यान घडली. सदर बाब ५ मार्च राेजी उघडकीस आली.
याबाबत उमेश भीमराव मुखमाले (४०) रा.वनोजा यांनी ५ मार्च रोजी तक्रार दिली की, फिर्यादीचा चुलत भाऊ रामदास शेषराव मुखमाले हे ४ मार्चचे रात्री हरभऱ्याला पाणी देतो म्हणून गेलेत ते परत आलेच नाही. ५ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता गावातील सुधीर इंगोले यांनी फोन करून सांगितले की, तुझ्या भावाच्या अंगावर दुचाकी पडून तो कांताबाई हिवराळे यांच्या शेतात मरण पावलेला दिसत आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.