एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २२ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 12:50 PM2021-07-03T12:50:57+5:302021-07-03T12:51:04+5:30

corona Cases in Washim : शुक्रवारी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर नव्याने २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

Death of one; Newly discovered 22 corona-infected | एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २२ कोरोनाबाधित

एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २२ कोरोनाबाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस ओसरत चालले आहे. दरम्यान, शुक्रवारी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर नव्याने २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. यापुर्वी उपचार घेत असलेल्यांपैकी ३० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० जण बाधित आढळले होते; मात्र दुसरी लाट तुलनेने अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. फेब्रूवारी ते २ जुलै २०२१ या कालावधीत संसर्गाने बाधित होणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढून ४१ हजार ४५० वर पोहोचला आहे. असे असले तरी १ जूनपासून संसर्गाच्या संकटातून बहुतांशी दिलासादेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात दैनंदिन बाधित आढळणाऱ्यांचा आकडा ३० च्या आतच राहत असून आजरोजी शासकीय व खासगी कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ १५५ आहे.
दरम्यान, आज नव्याने कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली व वाई येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून मालेगावातील मसला येथे एकजण बाधित आढळला. याशिवाय रिसोड तालुक्यात ७, मंगरूळपीर तालुक्यात ४, कारंजा तालुक्यात ८ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. मानोरा शहर व तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले. 

Web Title: Death of one; Newly discovered 22 corona-infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.