विष प्राशन केलेल्या शेतक-याचा मृत्यू

By admin | Published: March 16, 2017 02:59 AM2017-03-16T02:59:04+5:302017-03-16T02:59:04+5:30

चिंताग्रस्त झाल्याने त्यांनी ७ मार्च रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

The death of the poisoned farmers | विष प्राशन केलेल्या शेतक-याचा मृत्यू

विष प्राशन केलेल्या शेतक-याचा मृत्यू

Next

मानोरा, दि. १५- तालुक्यातील कार्ली येथील रामचंद्र बळीराम वाघमारे (७३) या शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून ७ मार्च रोजी विष प्राशन केले होते. त्यांचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कार्ली येथील शेतकरी रामचंद्र बळीराम वाघमारे यांच्याकडे ३.२४ एकर शेती आहे. त्यांच्यावर २0१३ पासून जिल्हा मध्यवर्ती बँके चे १ लाख ३१ हजार ९0८ रुपये कर्ज आहे. सलग चार वर्षांंपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना केल्यानंतर यंदा समाधानकारक पाऊस पडूनही शेतमालास योग्य भाव न मिळाल्याने ते चिंतेत होते. तीन वर्षांंपासून बँकेच्या कर्जाची परतफेड ते करू शकले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झाल्याने त्यांनी ७ मार्च रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: The death of the poisoned farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.