जनावराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By admin | Published: May 9, 2017 01:59 PM2017-05-09T13:59:27+5:302017-05-09T13:59:27+5:30

अकोला येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

Death of a woman in the dust of the animal | जनावराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

जनावराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Next

वाशिम : येथील लाखाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या शितल दिलीप मालपानी या मोटरसायकलने शहरामधुन घरी परत जात असताना जनावर आडवे आले. या घटनेत मालपाणी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचेवर अकोला येथे उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारला उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. 
वाशिम शहरातील लाखाळा परिसरात शितल दिलीप मालपाणी यांचे वास्तव्य आहे. शितल मालपाणी या कामानिमित्त मोटरसायकलने शहरामध्ये आल्या होत्या. आपले काम आटोपून घरी परत जात असताना निरंकारी भवनच्या समोर एका जनावराने अचानक त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेमध्ये त्या रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मालपाणी यांना वाशिम येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

Web Title: Death of a woman in the dust of the animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.