दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:39 PM2017-09-07T19:39:08+5:302017-09-07T19:40:07+5:30

कामरगाव : दुचाकीच्या चाकामध्ये साडीचा पदर अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील लाडेगाव गावानजीक ७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रंजना नरेंद्र देशमुख (४४) असे मृतक महिलेचे नाव आहे.

The death of a woman in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देचाकामध्ये साडीचा पदर अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू कारंजा तालुक्यातील लाडेगाव गावानजीक घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : दुचाकीच्या चाकामध्ये साडीचा पदर अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील लाडेगाव गावानजीक ७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रंजना नरेंद्र देशमुख (४४) असे मृतक महिलेचे नाव आहे.
एम.एच.२९ एक्स ४२७ क्रमांकाच्या दुचाकीवर वटफळी ता. नेर जि. यवतमाळ येथील देशमुख हे कामरगावरुन लाडेगावमार्गे वटफळी येथे जात होते. दरम्यान दुचाकीवर बसलेल्या रंजना नरेंद्र देशमुख यांच्या साडीचा पदर चाकात अडकल्याने त्या लाडेगाव गावानजीक खाली पडल्या. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने जखमीला प्राथमिक उपचार मिळाले नाहीत. पुढील उपचारार्थ अमरावती येथे नेत असताना, रस्त्यातच रंजना देशमुख यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारंजा तहसिलदारांना तातडीने कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याबाबत आमदार राजेंद्र पाटणी यांनी वैद्यकीय उपसंचालकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून कामरगाव येथे पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कामरगाव येथे लहाने नामक डॉक्टारांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम, जमादार नरेंद्र राजगुरे, सुनील टाले करीत आहेत.

Web Title: The death of a woman in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.