९८ हजार शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 03:17 PM2019-08-24T15:17:12+5:302019-08-24T15:17:19+5:30
जिल्ह्यातील ९८ हजार ८०० शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा अद्याप कायमच आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील ९८ हजार ८०० शेतकऱ्यांच्या ‘सातबारा’वर कर्जाचा बोझा अद्याप कायमच आहे. थकबाकीचा हा आकडा तब्बल १२०० कोटी रुपये असून संबंधित शेतकºयांना यंदा नव्याने पीक कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, २०१८-१९ ची खरीप पीक वाटप प्रक्रिया देखील यामुळे वांध्यात सापडली आहे. गुरूवार, २३ आॅगस्टपर्यंत १५३० कोटी रुपये उद्दीष्टाच्या तुलनेत केवळ ३३६ कोटी (२२ टक्के) पीक कर्ज वाटप होऊ शकले.
प्राप्त माहितीनुसार, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना ९०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्याची परतफेड न झाल्यामुळे संबंधित शेतकºयांना वर्षभराच्या मुदतीत त्याची परतफेड न झाल्याने संबंधित शेतकºयांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. यामुळे सन २०१७-१८ मध्ये पीक कर्ज वाटपाचा आकडा घसरून ३३२ कोटींवर आला; मात्र पीक कर्ज घेणाºया सुमारे ९८ हजार ८०० शेतकºयांनी शासनाकडून आज ना उद्या कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने त्यांच्याकडील दोन्ही वर्षाची थकबाकी अदा केली नाही. परिणामी, २०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी संबंधितांना पीक कर्ज मिळाले नाही. यामुळे २०१८-१९ मधील खरीप हंगामासाठी ठरविण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाच्या १५३० कोटी उद्दीष्टाच्या तुलनेत ३३६ कोटी रुपयेच कर्जाची उचल झाली. कर्जाचे हप्ते नियमित भरणाºया ५६ हजार ३२० शेतकºयांपैकी ४१ हजार ७३० शेतकºयांनी कर्ज घेतले असून त्याचे प्रमाण ७५ टक्के असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिली.
२०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षात खरीप पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९८ हजार ८०० शेतकºयांकडे १२०० कोटींची थकबाकी प्रलंबित आहे. त्यापैकी २८ हजार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहेत; परंतु त्यांचा सातबारा कोरा व्हायचा बाकी आहे. जे ५६ हजार ३२० शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, त्यापैकी ४१ हजार ७३० शेतकºयांनी यंदा कर्जाची उचल केली आहे. त्याचे प्रमाण तब्बल ७५ टक्क्यांच्या आसपास आहे.
- दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम