कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेचे ‘ऑडिट’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 02:52 PM2020-01-03T14:52:11+5:302020-01-03T14:57:06+5:30
शेतकऱ्यांच्या खात्याला आधार जोडणीचे काम वेगात सुरू असून, पात्र शेतकºयांच्या कर्ज रकमेचा हिशोबही करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्याला आधार जोडणीचे काम वेगात सुरू असून, पात्र शेतकºयांच्या कर्ज रकमेचा हिशोबही करण्यात येत आहे. या संदर्भात गुरुवारी दुपारी राज्याच्या मुख्यसचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिकाºयांसह सर्व संंबंधित अधिकारी आणि बँकांच्या अधिकाºयांना मार्गदर्शन करीत आवश्यक सुचना दिल्या असून, शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी तातडीने कर्जरकमेचा हिशोब करण्याच्या सुचना केल्या आहेत.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ चा लाभ देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. यात राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना त्यांचे खाते आधारक्रमांकाशी कुठल्याही स्थितीत जोडणे अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे या योजनेचा लाभ शेतकºयांना देण्यासाठी जिल्ह्यात आधार संलग्न बँक खाते नसलेल्या शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात येत असून,आधार लिंक खाते नसलेल्या ६१ हजारांपैकी जवळपास ४९ हजार हजार शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात (लिंक) करण्यात आले आहेत. आता उर्वरित शेतकºयांचे आधार क्रमांक खात्याशी जोडण्यात येत असतानाच प्रशासनाला शेतकºयांकडे थकित कर्जरकमेचा हिशोब जुळविण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असताना त्या कर्जाची अद्यापपर्यंत संबंधित शेतकºयांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकºयांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०१९ चा लाभ मिळणार आहे.
आधार न जोडणाºया शेतकºयांची यादी होणार प्रसिद्ध
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सर्व पात्र शेतकºयांना लाभ देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत बँकांनी मिशन मोडवर काम करुन ७ जानेवारीपर्यत थकीत कर्जदार शेतकºयांचे बँक खाते हे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नीत करावे लागणार आहेत. तथापि, निर्धारित मुदतीतही जे शेतकरी आपले खाते आधारलिंक करणार नाहीत, अशा शेतकºयांच्या याद्या प्रशासनाकडून सेवा सोसायट्या, सहनिबंधक कार्यालय, तसेच सर्व संबंधित बँकांद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर या शेतकºयांना तातडीने आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात येईल.