कर्जमुक्ती योजना : दोन गावांतील ४६७ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:04 PM2020-02-25T15:04:38+5:302020-02-25T15:04:44+5:30
यादीमध्ये नावे असलेल्या शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली ‘आॅनलाईन’ यादी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील कळंबा महाली व सावरगाव बर्डे येथील ४३७ शेतकºयांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे. यादीमध्ये नावे असलेल्या शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे.
कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकºयांच्या पहिल्या यादीत कळंबा महाली गावातील २६६ तसेच सावरगाव बर्डे येथील १७१ शेतकºयांचा समावेश आहे. पात्र शेतकºयांची नावे असलेल्या यादीच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणसाठी विशेष कॅम्पचे आयोजनही करण्यात आले. कळंबा येथे वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, सहाय्यक निबंधक आर. एल. गाडेकर, आपले सरकार सेवा केंद्रचे समन्वयक भगवंत कुलकर्णी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष तलवारे यांनी आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकºयांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.
सावरगाव येथेही आपले सरकार सेवा केंद्र आणि विभाग व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही करण्यात आली.
(प्रतिनिधी)