वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा - ‘आप’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:54 PM2017-12-11T17:54:39+5:302017-12-11T18:00:09+5:30
वाशिम: विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत घोषित करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ११ डिसेंबरला जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात पुढे नमूद आहे की, यावर्षी वाशिम जिल्ह्यात तुलनेने कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिप हंगामातील पिकांपासून विशेष उत्पन्न घेता आले नाही. त्यातच अनेकांच्या पेरण्या उलटल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले. त्यातून शेतकरी कसाबसा सावरला; तर पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामातील पिकांनीही दगा दिला. परिणामी, उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तथापि, शासनाने नापिकीचा सर्वे करून तद्वतच दुष्काळसदृष स्थिती लक्षात घेता शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. दिल्ली सरकारने शेतकºयांना दिलेल्या मदतीप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. तसेच शेतमजूरांकरीता योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर ‘आप’चे सुरेश सातरोटे, अॅड. गजानन मोरे, राजेश गिरी, मोहन महाले, ज्ञानेश्वर महाले, विनोद पट्टेबहादूर, राम पाटील डोरले, प्रदीप पेंढारकर, अमीन कलरवाले, गणेश वाघमारे, गोपाल परांडे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.