मेडशी आरोग्य वर्धिनी केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:52+5:302021-02-16T04:41:52+5:30
मेडशी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे, जि. प. सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, पं. स. ...
मेडशी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे, जि. प. सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, पं. स. सदस्य कौशल्याबाई रामभाऊ साठे, तंटामुक्त समिती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, माजी पं. स. सदस्य गजानन शिंदे, प्रदीप तायडे, ग्रा. पं. सदस्य अभिजित मेडशीकर, कैलाश ढाले, सुभाष तायडे, मोहसीनखां पठाण, अजिंक्य मेडशीकर, आरोग्य कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पूर्वीची इमारत जीर्ण झाली होती, तसेच तेथे इतर सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मेडशी येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य वर्धिनी केंद्रात रूपांतर करून यासाठी नवी इमारत उभारण्यात आली. या आरोग्य वर्धिनी केंद्रात आता पूर्वीच्या तुलनेत अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात या इमारतीत क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात ग्रा.पं. सदस्य शेख जमीर शेख गनिभाई यांनी महत्त्वाची भूमिका वठविली होती.