काेराेना काळातही ऑनलाईन याेग शिबिर घेणाऱ्या दीपा वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:27+5:302021-03-08T04:38:27+5:30

वाशिम : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या तसेच विविध पुरस्कारप्राप्त याेगतज्ज्ञ दीपा वानखडे यांनी संपूर्ण काेराेना काळात सर्वप्रकारचे गर्दी हाेणारे कार्यक्रम ...

Deepa Wankhade, who also conducted online yoga camps during her career | काेराेना काळातही ऑनलाईन याेग शिबिर घेणाऱ्या दीपा वानखडे

काेराेना काळातही ऑनलाईन याेग शिबिर घेणाऱ्या दीपा वानखडे

Next

वाशिम : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या तसेच विविध पुरस्कारप्राप्त याेगतज्ज्ञ दीपा वानखडे यांनी संपूर्ण काेराेना काळात सर्वप्रकारचे गर्दी हाेणारे कार्यक्रम बंद असताना ऑनलाईन याेग शिबिरातून धडे देत नागरिकांची प्रतिकारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोणीही घराबाहेर पडत नव्हते. अशातच वेळेचा सदुपयोग व्हावा याकरिता पतंजली परिवार तथा महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी दीपा रवी वानखडे यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढावी याकरिता सोशल मीडियाव्दारे योग प्राणायामाचे धडे नागरिकांना दिले. त्यांचे हे कार्य आजही अविरत सुरु आहे. काेराेना काळात योग करुन प्रतिकारशक्ती वाढविणे, आयुर्वेदाचा आधार घेऊन शरिराचे, इंद्रियाचे, मनाच्या सर्वप्रकारच्या रोग व्याधीपासून रक्षण करणे होय. वातावरण, पर्यावरण शुध्दी करुन स्वच्छतेचा संदेश पोहोचविणे या अनुषंगाने वाशिम येथील पतंजली परिवार, महिला पतंजली योग समितीच्या पुढाकाराने दीपा वानखडे यांनी उपक्रम सुरु केला आहे. पतंजली योग साधना या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपव्दारे त्या दररोज व्हिडीओव्दारे योगा, प्राणायमाचे प्रकार, त्याबाबत इत्यंभूत माहिती त्याचे फायदे ग्रुप सदस्यांना त्यांनी पटवून दिले. त्यांच्या कार्याची विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली. भारत स्वाभिमान पतंजली योग समिती, वाशिमचे कोषाध्यक्ष व आजीवन सदस्य पतंजली योगपीठ, हरिव्दारचे डॉ. भगवंतराव वानखडे, संघटनमंत्री शंकर उजळे व पंतजली परिवाराच्या याेग्य मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे दीपा वानखडे सांगतात.

.................

दीपा यांच्या कार्याचा गाैरव

याेगतज्ज्ञ दीपा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ३ मार्च राेजी बेटी बचाओ फांऊडेशनतर्फे ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ देण्यात आला. त्यांना २०१९मध्ये नि:शुल्क याेगसेवेसाठी व्हाईट स्पेस संस्था, पुणेकडून, २०२०मध्ये कवी डाॅ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते ‘युथ आयकाॅन पुरस्कार’ यासह विविध सामाजिक संघटनांचे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील याेग शिक्षक व याेग मूल्यांकन परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत.

Web Title: Deepa Wankhade, who also conducted online yoga camps during her career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.