दीपक मोरे पुन्हा वाशिमचे मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:29+5:302021-05-20T04:44:29+5:30
येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दीपक मोरे यांची अकोला महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तपदी ३ मे रोजी बदली झाली ...
येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दीपक मोरे यांची अकोला महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तपदी ३ मे रोजी बदली झाली होती. आता पुन्हा त्यांची बदली परत वाशिमचे मुख्याधिकारी म्हणून झाली आहे.
वाशिम नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेले दीपक मोरे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्या नंतर प्रशासनाची विस्कटलेली घडी रुळावर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. शहरात मोठ्या प्रमाणात पसरलेले अतिक्रमण काढण्याचे काम मोरे यांनी धडाकेबाज केले होते तसेच शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या दीपक मोरे यांची बदली अकोला महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तपदी झाली होती. आता परत ते वाशिम येथे मुख्याधिकारी म्हणून आले आहेत.