स्टेट बँकेच्या मानोरा शाखेची पीक कर्ज वितरणात संथगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:45+5:302021-08-20T04:47:45+5:30
शहरात स्टेट बँकेच्या रूपाने एकच राष्ट्रीयीकृत बँक आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना अनेक व्यवहार स्टेट बँकेमध्ये करावे लागते, तसेच मागील ...
शहरात स्टेट बँकेच्या रूपाने एकच राष्ट्रीयीकृत बँक आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना अनेक व्यवहार स्टेट बँकेमध्ये करावे लागते, तसेच मागील जुलै महिन्यात आठ दिवस बँक बंद असल्याने शेतकरी यांना पीक कर्ज वेळेवर मिळाले नाही.
याबाबत येथील माजी सैनिक रशिदखा पठाण यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना तक्रार केली होती. त्याची दखल स्टेट बँक अग्रणी कार्यालय वाशिम यांनी घेतली आहे.
मानोरा शाखा अधिकारी यांना एक पत्र देऊन रशीद खान यांनी केलेल्या तक्रारीत असलेल्या मुद्यांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आता बँक प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा होईल व लोकांना योग्य सुविधा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
०००००००००००००००००
काेट: मानोरा येथे एकच राष्ट्रीयीकृत बँक असून, याच बँकेत अनेक व्यवहार केले जातात, मात्र गेल्या काही महिन्यापासून येथे आवश्यक संख्येने अधिकारी, कर्मचारी नाहीत, कायमस्वरूपी व्यवस्थापक नाही, ऑनलाइन कामे करताना कनेक्टिव्हीटी राहत नाही. कार्यरत कर्मचारी खातेदारांना योग्य वागणूक देत नाहीत. पीक कर्ज वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आपण तक्रार केली होती.
- रशीद खा पठाण माजी सैनिक, मानोरा