सूक्ष्म सिंचन योजनेत राज्य शासनाच्या निधीला विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:46 AM2017-11-29T01:46:02+5:302017-11-29T01:46:22+5:30
सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना वितरित करण्यासाठी मंजूर झालेल्या ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीतील केंद्र शासनाकडून मिळणार्या ६0 टक्के निधीतील रक्कम जिल्हा कृषी विभागाच्या खात्यावर जमा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना वितरित करण्यासाठी मंजूर झालेल्या ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीतील केंद्र शासनाकडून मिळणार्या ६0 टक्के निधीतील रक्कम जिल्हा कृषी विभागाच्या खात्यावर जमा झाली आहे; परंतु राज्य शासनाकडून मिळणार्या ४0 टक्के निधीची रक्कम अद्याप खात्यावर जमा न होण्यास विलंब लागल्याने अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकर्यांना तुषार आणि ठिबक सिंचन साहित्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविल्यानंतर मंजूर निधीच्या प्रमाणात शेतकर्यांना पूर्वसंमती देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकर्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे.
आता पूर्वसंमती देण्यात आलेल्या शेतकर्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाचा ६0 टक्के निधी प्राप्त झाला असून, डीपीडीसी अंतर्गत राज्य शासनाचा ४0 टक्के निधी प्राप्त होण्यास विलंब लागला आहे. त्यामुळे सिंचन साहित्य खरेदी करणार्या शेतकर्यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया खोळंबली. सूक्ष्म सिंचन योजना योजनेंतर्गत ठिबक सिंचनासाठी ‘इनलाइन, ऑनलाइन’, ‘सबसरफेस’, ‘मायक्रोजेट’, ‘फॅनजेटस, तर तुषार सिंचनासाठी ‘मायक्रो स्प्रिंकलर’, ‘मिनी स्प्रिंकलर’, ‘पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन’ आदी साहित्याच्या खरेदीनंतर अनुदान देण्यात येते. यामध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यास ६0 टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक शेतकर्यासह ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यास ४५ टक्के आणि अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक शेतकर्यांस ३५ टक्के अनुदान देण्यात येते.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात ८६२१ शेतकर्यांनी ऑनलाइन प्रस्ताव सादर केले हो ते. त्यामधील ५८८ प्रस्ताव छाननीत रद्द झाले, तर मंजुरीनंतर १७ प्रस्ताव रद्द करण्यात आले. उर्वरित ८0१५ पैकी ३८७२ प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली. त्यापैकी २५५२ शेतकर्यांकडून साहित्य खरेदीची बिले सादर करण्यात आली आणि त्याची पडताळणी करून ८00 शेतकर्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. तथापि, कृषी विभागाला केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीमधून जिल्हय़ातील पात्र शेतकर्यांच्या खात्यात अनुदानाची र क्कम जमा करण्यात येत आहे.
उर्वरित प्रस्तावांच्या पूर्वसंमतीची प्रक्रिया लवकरच!
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, कृषी उत्पादन आणि पयार्याने शेतकर्याच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करून त्याची वृद्धी व प्रसार करण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबविण्यात येत असून, या योजनें तर्गत जिल्हा कृषी विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या उर्वरित प्रस्तावांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सूक्ष्म सिंचन योजनेतील केंद्राच्या निधीनंतर राज्य शासनाच्या निधीला थोडा विलंब लागला; परंतु कोणत्याही पात्र लाभार्थीचे अनुदान थकले नसून, ही अनुदान खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पूर्वसंमती दिलेल्या शेतकर्यांना अनुदान वितरित होणार आहे.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिक ारी, वाशिम
-