अन्नाची नासाडी टाळून गरजवंतांना वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:09 PM2019-03-29T16:09:36+5:302019-03-29T16:09:42+5:30
शितला मातेला भोग म्हणून विविध खाद्यपदार्थ व पुरीभाजी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले. यातून शिल्लक राहिलेल्या पदार्थांची नासाडी टाळण्यासाठी ते गोरगरीबांना वितरित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राजस्थानी समाजाच्यावतीने शितला सप्तमी व अष्टमीनिमीत्त गुरूवार २८ मार्च रोजी शितलामातेचे पुजन करण्यात आले. यावेळी शितला मातेला भोग म्हणून विविध खाद्यपदार्थ व पुरीभाजी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले. यातून शिल्लक राहिलेल्या पदार्थांची नासाडी टाळण्यासाठी ते गोरगरीबांना वितरित करण्यात आले.
अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ वाशिमच्यावतीने राजस्थानी मंडळाच्या पुढाकाराने अन्नाची नासाडी टाळण्यासाठी समाजात जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत शितलामातेला चढविण्यात येणारा प्रसाद पाकिटबंद करून सदर प्रसादाचे वितरण गरजवंतांच्या झोपडीत व निवासस्थानी जावून वितरीत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनाला राजस्थानी समाजातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. महिला मंडळाच्यावतीने गरजवंतांच्या दारी जावून प्रसादासह भोजन, खाद्य पदार्थांचे वितरण करण्यात आले. आकस्मिक मिळालेल्या मदतीने अनेकांच्या चेहºयावर स्मितहास्य दिसून आले. सदर उपक्रमांच्या यशस्वीतेकरीता प्रांतीय अध्यक्षा छाया मानधने, राजस्थाीन मंडळ अध्यक्षा प्रेरणा अग्रवाल, सचिव पुनम लढ्ढा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाकरीता पुजा चांडक, अग्रवाल महिला मंडळाच्या मिना कंदोई, सविता अग्रवाल, सोनल अग्रवाल, ज्योती छापरवाल, नयन मुंदडा, पायल छापरवाल, संतोष अग्रवाल, नंदा वर्मा, मेघा अग्रवाल, सुनिता गट्टाणी, रिना संचेती, चंद्रभागा बगडे, दुर्गा बगडे, नरेंद्र बगडे आदिंच्या उपस्थितीत गरजवंतांच्या दारी प्रसाद , खाद्यपदार्थ वितरीत करण्यात आले.