रेमडेसिविरचे ५०० 'व्हायल' उसने देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:42+5:302021-05-07T04:43:42+5:30
अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांना प्रत्येकी ५०० व २५० व्हायल उसनवारीवर देण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले आहेत. तोच ...
अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांना प्रत्येकी ५०० व २५० व्हायल उसनवारीवर देण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले आहेत. तोच न्याय वाशिमला का नाही? असा सवालही घोपे यांनी उपस्थित केला आहे. अमरावती विभागातील वाशिमसह सर्वच पाचही जिल्ह्यांत आजमितीला कोरोनाने कहर माजविला आहे. दैनंदिन चाचण्यांपैकी सुमारे १५ ते २० टक्क्यांपेक्षाही अधिक चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. परिणामी सक्रिय रुग्णसंख्येचा आलेख सतत चढता असून खाटा, औषधींचा तुटडा पडत आहे. कोरोनाच्या आजारावर काहीअंशी रामबाण ठरत असलेल्या रेमडेसिविरची टंचाई तर प्रचंड वाढली आहे. बुलडाण्याचा अपवाद वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत रेमडेसिविर मिळत नाहीत. नेमकी हीच बाब हेरून अकोल्याच्या एका विधिज्ञांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने अकोला जिल्ह्यासाठी तीन हजार रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याचे सरकारला आदेशित केले. त्यानुसार सदर इंजेक्शन अकोल्यात पोहोचले. मात्र, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांची गरज लक्षात घेता विभागीय आयुक्तांनी यातील ५०० व्हायल अमरावतीला, तर २५० व्हायल यवतमाळला उसने देण्याचे संबधितांना आदेशित केले आहे. अमरावती, यवतमाळच्या तुलनेत वाशिम जिल्ह्याला मिळणारे रेमडेसिविर कमी आहेत. रुग्ण संख्या मात्र लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या धर्तीवर वाशिमला ५०० व्हायल उसने देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी घोपे यांनी आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.