‘त्या’प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:18+5:302021-06-01T04:31:18+5:30

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जालना येथील खासगी दवाखान्यात काही दिवसांपूर्वी तोडफोडची घटना घडली. ...

Demand for action against the police in that case | ‘त्या’प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

‘त्या’प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

Next

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जालना येथील खासगी दवाखान्यात काही दिवसांपूर्वी तोडफोडची घटना घडली. त्यात शिवराज नारियलवाले यांना संशयावरून जेरबंद करत जालना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस कर्मचारी सोमनाथ लांबगे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकडे, होमगार्ड पठाण आदींनी अमानुष मारहाण केली. यासह गवळी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

निवेदनावर महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुम्माभाई बंदूकवाले, सचिव सुभान चौधरी, कारंजा नगर परिषदेचे उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले, माजी जिल्हाध्यक्ष रहेमानभाई नंदावाले, ॲड. सुभान खेतिवाले, कय्यूमभाई जट्टावाले, माजी सचिव लियाकतभाई मुन्नीवाले, प्रदेश उपाध्यक्ष कासमभाई नौरंगाबादी, माजी विभागीय प्रमुख टिकाराम बरेटिया, बाबू पप्पूवाले, प्रा. सी. पी. शेकुवाले, रहेमान शेकुवाले, मुकेश चौधरी, युसुफ शेख नौरंगाबादी, संतोष चौधरी, अब्दुल चौधरी, सलिम बेनिवाले, पार्शद राजू जानिवाले, ॲड. जिनसाजी चौधरी, कासम बेनीवाले, उस्मान दरगीवाले, सलिम भिका बेनिवाले, बदरोद्दीन मुन्नीवाले, धन्नू भावनीवाले, रहिम पप्पूवाले, युसुफ खेतिवाले, हुसैन शेकुवाले, शकील पप्पूवाले, सलिम शेकुवाले, इमाम भावनीवाले, मोहम्मद प्यारेवाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for action against the police in that case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.