मिनी ट्रॅक्टरप्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:48+5:302021-09-23T04:47:48+5:30

निवेदनानुसार, पंचशील स्वयंसहायत्ता महिला बचत गटाला समाजकल्याण विभागाकडून अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व अन्य साहित्याचा लाभ मिळाला. अनुदानावर मिळालेल्या मिनी ...

Demand for action in mini tractor case | मिनी ट्रॅक्टरप्रकरणी कारवाईची मागणी

मिनी ट्रॅक्टरप्रकरणी कारवाईची मागणी

Next

निवेदनानुसार, पंचशील स्वयंसहायत्ता महिला बचत गटाला समाजकल्याण विभागाकडून अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व अन्य साहित्याचा लाभ मिळाला. अनुदानावर मिळालेल्या मिनी ट्रॅक्टर व साहित्याची विक्री करता येत नाही. परंतु, अध्यक्ष व सचिवांनी या मिनी ट्रॅक्टरची विक्री केल्याचे निवेदनात नमूद आहे. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव वगळता अन्य कुण्या सदस्याला या मिनी ट्रॅक्टर व साहित्याबाबत कोणतीही माहिती नाही तसेच मिनी ट्रॅक्टर बघितलादेखील नाही. याप्रकरणी योग्य ती चौकशी करावी, दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध व चौकशीअंती दोषी आढळून येणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पंचशील स्वयंसहायत्ता महिला बचत गटातील अन्य आठ सदस्यांनी केली. निवेदनावर संगीता सरनाईक, कुसुम सरनाईक, अनिल धबाले, सुनंदा भोयभारे यांच्यासह आठ महिलांच्या स्वाक्षरी आहेत.

....

कोट

हिवरापेन येथील बचत गटातील महिलांचे निवेदन मिळाले आहे. त्याअनुषंगाने पुढील चौकशी केली जाईल.

- एम.जी. वाठ

सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, वाशिम

Web Title: Demand for action in mini tractor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.