भूखंडप्रकरणी कार्यवाहीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:36+5:302021-01-20T04:39:36+5:30
निवेदनात नमूद आहे की, वाशिम जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून भूखंडाची शासकीय खरेदी प्रक्रिया बंद असल्यामुळे नागरिकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न ...
निवेदनात नमूद आहे की, वाशिम जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून भूखंडाची शासकीय खरेदी प्रक्रिया बंद असल्यामुळे नागरिकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न अधांतरीच राहात आहे. तसेच भूखंडाच्या खरेदी-विक्रीपोटी प्रशासनाच्या महसूल विभागाला मिळणारा कोट्यवधीचा महसूलही बुडत आहे. असे असले तरी अनेकजण आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी जागा विकत घेत आहेत; परंतु या जागेला शासनदरबारी नियमानुकूल करण्यासाठी व बांधकामासह पुढील आवश्यक त्या सुविधा मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहता जिल्ह्यात भूखंड खरेदीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी संघटनेने ३ डिसेंबर २०२० रोजी निवेदन दिले होते. परंतु या निवेदनावर प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे २६ जानेवारीपासून उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी दिला.